ऑगस्ट क्रांतिदिनी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आजी-माजी सैनिक सन्मान सोहळा संपन्न
शहिदांच्या रक्तानं भिजली इथली माती I
त्याचा तिलक लावूया आज आपुल्या माथी II
शौर्य आणि पराक्रमाची सांगे तिरंगा गाथा I
माझ्या भारत भूचा सदैव उन्नत माथा II
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा (स्वायत्त) मधील इतिहास विभाग, हिंदी विभाग आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट क्रांतिदिन व महाविद्यालयाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार, दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ रोजी बॅ. पी. जी. पाटील सभागृह, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय साताराचे प्रमुख कर्नल एस. डी. हंगे साहेब (निवृत्त) यांच्या परवानगीने व महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील ‘आजी-माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी, कराड, पाटण, फलटण, माण खटाव, कोरगाव, खंडाळा, वाई, महाबळेश्वर इत्यादी तालुक्यांसह सातारा लगतच्या विविध जिल्ह्यातून सुमारे ३०० पेक्षा अधिक आजी-माजी सैनिक, वीरमाता व वीरपत्नी या मेळाव्यासाठी उपस्थित होत्या. सन १९४७ मध्ये थोर शिक्षणतज्ञ, समाजसुधारक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने स्थापन केलेलं पहिले महाविद्यालय म्हणून स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला १५ जून १९४७ रोजी या महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे. हे महाविद्यालय दरवर्षी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशरक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केलेल्या सैनिकांच्याप्रती आदराची भावना व्यक्त करण्याच्या उद्देशाने व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाचे मूल्य रुजविण्यासाठी या सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
शुरवीरांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची संपूर्ण भारतात ओळख आहे. देशाच्या रक्षणासाठी सातारा जिल्ह्याने खूप मोठे योगदान दिले आहे. देश रक्षणासाठी सैन्यामध्ये भरती होऊन आपले सर्वस्व अर्पण करणारे सीमेवरील जवान हेच आपले खरे आयडॉल आहेत. सर्व सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा असणारा त्याग हा अनमोल आहे. तो कोणत्याही गोष्टीत मोजता येणारा नाही. तेव्हा या सैनिक मेळाव्याच्या माध्यमातून त्यांच्याप्रती आदराची भावना व्यक्त करण्याच्या माध्यमातून हा आगळावेगळा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आजी-माजी सैनिक सन्मान मेळाव्याच्या उद्घाटन समारंभप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख साहेब, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे कुलगुरू माननीय प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे साहेब, माजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. विलास घाडगे, एन. सी. सी. बटालियन कोल्हापूरचे श्री. रवींद्र चव्हाण, मा. देवराम बर्गे, मा. सुरेश फडतरे, मा. अशपाक पटेल, मा. आप्पा पडवळ, मा. सुर्यकांत पडवळ, मा. तानाजी ताटे (तासगाव), रामराव रामपुरे (वाई), संतोष नलावडे (वेटणे), महादेव निकम (अपशिंगे मि.), रामचंद्र निकम (अपशिंगे मि.), मा. उद्धव साळुंखे, मा. प्रकाश जाधव व बहुसंख्य आजी-माजी सैनिक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतिहास विभाग प्रमुख प्रो.(डॉ.) धनाजी मासाळ यांनी या कार्यक्रमाच्या आयोजना पाठीमागची भूमिका विशद करून सर्वांचे शब्दसुमानांनी स्वागत केले. त्यांनतर अनेक आजी – माजी सैनिकांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यांनतर रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. विकास देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे कुलगुरू माननीय प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे साहेब यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर आजी-माजी सैनिकांना महाविद्यालयाच्या वतीने सन्मानपत्र, गुलाबपुष्प व महाविद्यालयाचे नियतकालिक असलेला ‘शिवविजय’अंक देऊन गौरविण्यात आले. तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने उपस्थित सैनिकांना ‘एक धागा शौर्याचा’ या उपक्रमांतर्गत राखी बांधण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या आजी-माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. इतिहास विभाग प्रमुख प्रो.(डॉ.) धनाजी मासाळ व हिंदी विभाग प्रमुख प्रो. (डॉ.) सविता मेनकुदळे यांच्या मौलिक सूचनानुसार इतिहास व हिंदी विभागातील सर्वांच्या विशेष सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न झाला. डॉ. संदीप किर्दत यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली तर डॉ. सीमा कदम व प्रा. महादेव चिंदे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. (डॉ.) अनिलकुमार वावरे, प्रो. (डॉ.) रोशनआरा शेख, डॉ.रामराजे माने-देशमुख, प्रो. (डॉ.) सुभाष वाघमारे, प्रो. (डॉ.) आर. आर. साळुंखे, प्रो. (डॉ.) शिवाजी पाटील, महाविद्यालयाचे कार्यालयीन प्रमुख श्री. तानाजी सपकाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. गणेश लोखंडे, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. गणेश पाटील, प्रा. संदीप भुजबळ, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नवनाथ इप्पर व डॉ. विद्या नावडकर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालयातील सिनिअर- ज्युनिअर व व्यावसायिक शिक्षण विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक बंधू आणि भगिनी, शिक्षक-शिक्षकेतर व सर्व प्रशासकीय सेवक आणि इतिहास विभाग, हिंदी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे विद्यार्थी यासर्वांच्या सहकार्यातून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा विद्यार्थी मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला.