Education

‘छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न’

mahadevchinde1 

माझं कॉलेज, माझा अभिमान-‘ऋणानुबंध’ छत्रपती शिवाजी कॉलेजचा

माझं कॉलेज,माझा अभिमान

                       

 

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा (स्वायत्त) मधील माजी विद्यार्थी संघ आणि कमवा व शिका योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ जुलै २०२४ रोजी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली  ‘माजी विद्यार्थी मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते.

सन १९४७ मध्ये थोर शिक्षणतज्ञ, समाजसुधारक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने स्थापन केलेलं पहिले महाविद्यालय म्हणून स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला १५ जून १९४७ रोजी स्थापना केली.  छत्रपती शिवाजी कॉलेजच्या ७७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कॉलेजच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल करत असलेले अनेक आजी-माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

माजी विद्यार्थी मेळाव्याच्या उद्घाटन समारंभप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री चंद्रकांत दळवी साहेब हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मा. डॉ. अनिल पाटील- संघटक रयत शिक्षण संस्था सातारा, मा. विकास देशमुख- सचिव, रयत शिक्षण संस्था सातारा, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के- कुलगुरू कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा, मा. श्री. रामशेठ ठाकूर- मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा, मा. प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे- सहसचिव (उच्च शिक्षण) रयत शिक्षण संस्था सातारा. मा. श्री. बी. एन. पवार- सहसचिव (माध्यमिक) रयत शिक्षण संस्था सातारा, श्रीमती मीनाताई जगधने- मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, डॉ. बी. टी. जाधव- प्राचार्य यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव मा. प्राचार्य आर. डी. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.उद्घाटन समारंभ प्रसंगी या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अभिमान निमसे यांनी कार्यक्रम आयोजना पाठीमागील भूमिका विशद केली. तर डॉ. संदीप किर्दतसर यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन केले.

कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. यामध्ये महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या किशोर शिंदे, प्रा. डॉ. मानसी लाटकर, श्री. के. डी.चव्हाण, श्री. सदाशिव बर्गे, यशेंद्र क्षीरसागर, हितेश साळुंखे, सरिता व्यवहारे, मयूर लाड यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण केले. तर सध्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या धनिष्ठा काटकर हिने आपल्या ‘नटले राया तुमच्या साठी….’ या लावणीचे बहारदार सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर मुख्य उद्घाटन समारंभ सुरु करण्यात आला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी विद्यार्थिनीसाठी महिला सन्मान व स्त्रीशक्ती कामगिरी कार्यक्रम, आजी-माजी विद्यार्थिनी संवाद, वेशभूषा, संगीत-खुर्ची आदी  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘कमवा व शिका योजनेसाठी माझे योगदान’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने कमवा व शिका योजनेमधून ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ याचे धडे गिरवत शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावरील व्याख्यानाचे व खुल्या संवादाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय ‘मी आणि माझे छत्रपती शिवाजी कॉलेज’ या अनुषंगाने अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील असलेल्या जुन्या आठवणी व ऋणानुबंधातल्या अविट भावना प्रगट केल्या. ‘पर्यावरण संवर्धन जनजागृती’ कार्यक्रमाच्या निमित्ताने काही व्हिडिओ क्लिप्सचे याप्रसंगी सादरीकरण करण्यात आले. छोट्याखानीसंपन्न झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये एकपात्री प्रयोग व गीत गायन यासारख्या कलांचे सादरीकरण करून अनेकांनी वाहवा मिळविली. ‘विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवर असलेल्या माजी विद्यार्थी यांच्या मुलाखती व शैक्षणिक विचारमंथन या कार्यक्रमात बदलत्या शैक्षणिक धोरणावर विस्ताराने चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपण शिक्षण घेतलेल्या विभागांमध्ये भेटी देऊन त्या ठिकाणची सर्व माहिती करून घेतली. महाविद्यालयातील ज्या परिसरात, ज्या ठिकाणी आपण वावरलो अशा वर्गखोल्या, ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग, जिमखाना विभाग, विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृह, क्रीडांगण इत्यादी ठिकाणी भेटी देऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी यांच्यासाठी Preservation and conservation of Historical Places, Value Education, Gender Sensitization, Save Earth, Solar Energy, National Integration, Social Harmony, मानसशास्त्रीय मापन आणि समुपदेशन आदी विषयांवर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. राजेंद्र मोरे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभसंदेशपर शुभेच्छापत्र देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान केला. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती माजी विद्यार्थ्यांसाठी ‘सेल्फी पॉईंट’ तयार करण्यात आलेला होता. याठिकाणी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले फोटो  काढून आपल्या पुढील आयुष्याच्या प्रवासासाठी आठवणींचा अनमोल ठेवा साठविण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयाच्या वतीने कमवा व शिका योजनेच्या बागेमध्ये नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या ‘कर्मवीर नर्सरी या रोपवाटिकेतून फुलझाडे खरेदी करून अनेकांनी ‘माझं कॉलेज माझं झाड’ या नवोपक्रमाला ‘एक हात मदतीचा’ जोडत पर्यावरण संवर्धनासाठी एक पाउल पुढे टाकले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या वतीने चहा, नाश्ता व रुचकर भोजनाची उत्तम प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती.

महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अभिमान निमसे यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. (डॉ.) अनिलकुमार वावरे, प्रो. (डॉ.) रोशनआरा शेख, डॉ.रामराजे माने-देशमुख, प्रो. (डॉ.) सुभाष वाघमारे, प्रो. (डॉ.) आर. आर. साळुंखे, प्रो. (डॉ.) शिवाजी पाटील, प्रो. (डॉ.) सविता मेनकुदळे, प्रो. (डॉ.) धनाजी मासाळ, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. राज चव्हाण, सर्व कार्यक्रमांचे सर्व समन्वयक, महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक बंधू आणि भगिनी, शिक्षक-शिक्षकेतर व सर्व प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी यासर्वांच्या सहकार्यातून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा विद्यार्थी मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला.

      

Recommended Posts

कर्मवीर भाऊराव पाटील
Social Reformers

द्रष्टे युगपुरुष, थोर शिक्षण भगीरथ: कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला विनम्र अभिवादन !

आधुनिक महाराष्ट्राला पुरोगामी वैचारिकतेची, क्रांतिकारी विचारांची, परिवर्तनवादी चळवळीची  गौरवशाली  परंपरा लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे त्यातील योगदान खूप मोठे आहे. शिक्षणाची द्वारे विशिष्ट वर्गापुरती बंधिस्त असताना रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून आपल्या कारकिर्दीमध्येच संस्था नावारूपाला […]

mahadevchinde1 
Motivational

II गुरु साक्षात परब्रह्म II

एक कृतज्ञतापूर्वक प्रणाम आपल्या आदरणीय गुरुवर्यांना भारतीय प्रथा आणि परंपरेनुसार प्रत्येक दिवसाला काही ना काही विशेष महत्त्व असते. त्याचप्रमाणे आज ०५  सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर ‘शिक्षक दिन’ म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे त्यानिमित्ताने….. ०५  सप्टेंबर हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा किंवा करू नये द्वंद्वात फारसे न जाता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा […]

mahadevchinde1 
Motivational

ऑगस्ट क्रांतिदिनी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आजी-माजी सैनिक सन्मान सोहळा संपन्न

शहिदांच्या रक्तानं भिजली इथली माती I त्याचा तिलक लावूया आज आपुल्या माथी II शौर्य आणि पराक्रमाची सांगे तिरंगा गाथा I माझ्या भारत भूचा सदैव उन्नत माथा  II                                             कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे घटक […]

mahadevchinde1