छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा मध्ये बी. ए. भाग एकसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु…
छत्रपती शिवाजी कॉलेज हे केवळ साताऱ्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक अग्रनामांकित महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. या कॉलेजची स्थापना स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला जून १९४७ मध्ये झाली. थोर समाजसुधारक शिक्षणभगीरथ, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे हे पहिले महाविद्यालय अशीही या कॉलेजची ओळख आहे. कॉलेजने आपल्या स्थापनेपासूनच विद्यापीठ कार्यक्षेत्रात आपल्या गुणात्मक, संस्थात्मक व संख्यात्मक बाबतीत आपला दबदबा कायम राखलेला आहे. या महाविद्यालयाने गेल्या ७७ वर्षात महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक विकासात अत्यंत उल्लेखनीय कार्य केलेले आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर साहित्य, कला, क्रीडा, वक्तृत्व, सांस्कृतिक, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आदी क्षेत्रांमध्येही स्वतःच्या नावाबरोबर महाविद्यालयाची वेगळी ओळख निर्माण करत आहेत.
महाविद्यालयाची वैशिष्ट्ये:-
- केवळ कला शाखेचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे महाविद्यालय
- अध्ययन, अध्यापन, संशोधन व विस्तार कार्य या बाबींची दखल घेऊन राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती समिती बेंगलोर यांच्याकडून महाविद्यालयास सन २०१७ मध्ये A+ दर्जा बहाल करण्यात आला.
- विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचेकडून महाविद्यालयास College with potential for excellence’ हा दर्जा प्रदान करण्यात आलेला होता.
- शिवाजी विद्यापीठाचे ‘अग्रणी महाविद्यालय’ म्हणून अनेक वर्ष या महाविद्यालयाने समर्थपणे नेतृत्व केले आहे.
- सन २०१८ पासून विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचेकडून महाविद्यालयास ‘स्वायत्त महाविद्यालय’ म्हणून दर्जा बहाल करण्यात आला आहे.
- सन २०२१ साली महाविद्यालयास ISO 9001:2015 मानांकन प्राप्त झालेले आहे.
- सन २०२१ पासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, साताराचे घटक महाविद्यालय म्हणून महाविद्यालय सध्या कार्यरत आहे.
महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये
- कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेले रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय.
- ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या ध्येयाने ‘श्रमाच्या मोबदल्यात शिक्षण’ हे सूत्र घेऊन सुरू असलेली ‘कमवा व शिका योजना’ आर्थिक दुर्बल घटकांच्या शैक्षणिक स्वप्नपूर्तीचा आधार
- विद्यापीठ कार्यक्षेत्रात उज्ज्वल व उत्कृष्ट निकालाची परंपरा
- दुर्मिळ संदर्भ ग्रंथयुक्त समृद्ध व सुसज्ज ग्रंथालय
- १००० पेक्षाही अधिक प्रशासकीय अधिकारी घडवणारे एकमेव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू घडवणारा जिमखाना विभाग व प्रशस्त क्रीडांगण
- तज्ञ, अनुभवी व प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग
- गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेढी (बुक बँक) योजना
- वातानुकुलीत सुसज्ज अभ्यासिका
- हुशार व गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक फी मध्ये आर्थिक सवलत
- सामाजिक बांधिलकी जोपासत कार्यरत असलेला राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभाग
- राष्ट्रप्रेमाची स्फूर्ती देणारा राष्ट्रीय छात्र सेना ( एन. सी.सी.) विभाग
- कमवा व शिका योजना विद्यार्थी आणि विद्यार्थीनीसाठी मोफत निवास व भोजन व्यवस्था
- बाहेरील विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र व प्रशस्त वसतिगृह
- केंद्रीय आर्मी आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग
- संशोधन पूरक सोयीसुविधा
- वायफाय सुविधायुक्त परिसर
- रोजगार मार्गदर्शनासाठी तत्पर प्लेसमेंट सेल
- उपहार गृह
- हेल्थ सेंटर
- विद्यार्थी दत्तक पालक योजना
महाविद्यालयात शिकविले जाणारे अभ्यासक्रम
- इयत्ता अकरावी
- इयत्ता बारावी
- व्यावसायिक अभ्यासक्रम (एम. सी.व्ही. सी.)
- पदवी- इंग्रजी, हिंदी, मराठी, संस्कृत, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र
- पदव्युत्तर पदवी– इंग्रजी, हिंदी, मराठी, संस्कृत, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र
- पीएच.डी. ( इंग्रजी, हिंदी, मराठी, संस्कृत, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र
- बी. व्होक- मिडिया अॅण्ड इंटरटेनमेंट
महाविद्यालयात शिकविले जाणारे इतर कोर्सेस
- सर्टिफिकेट कोर्स इन ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम
- सर्टिफिकेट कोर्स इन मोडी स्क्रिप्ट
- पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा कोर्स इन डिजिटल कार्टोग्राफी
- पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा कोर्स इन स्कूल कौन्सलिंग
- डिप्लोमा कोर्स इन जिओइन्फॉरमॅटिक्स
- डिप्लोमा कोर्स इन ब्युटी अॅण्ड वेलनेस
- अॅडव्हान्स कोर्स इन ब्युटी अॅण्ड वेलनेस
- सर्टिफिकेट कोर्स इन कम्युनिकेशन स्कील
- सर्टिफिकेट कोर्स इन जर्मन
- सर्टिफिकेट कोर्स इन इव्हेंट मॅनेजमेंट
- सर्टिफिकेट कोर्स इन म्युझिक
- सर्टिफिकेट कोर्स इन जापनीज
- सूत्रसंचालन व निवेदन प्रमाणपत्र कोर्स
- सर्टिफिकेट कोर्स इन जर्नालिझम
- आवाज संवर्धन व संभाषण कौशल्य
- भारतीय रेल: स्वरूप और अवसर प्रमाणपत्र कोर्स
- सर्टिफिकेट कोर्स इन वारली पेंटिंग
- सर्टिफिकेट कोर्स इन मेकिंग बेकरी प्रोडक्ट
- सर्टिफिकेट कोर्स इन चाइल्ड अॅण्ड वूमन स्टडीज
- सर्टिफिकेट कोर्स इन स्टडी ऑफ सोशिअल वेल्फेअर अॅण्ड लेजिस्लेशन
- सर्टिफिकेट कोर्स इन टेलरिंग अॅण्ड फॅशन डिझायनिंग
- फौंडेशन कोर्स इन ह्युमन राईट
- सर्टिफिकेट कोर्स इन लीडरशिप डेव्हलपमेंट
- सर्टिफिकेट कोर्स इन स्टॉक मार्केट
- सर्टिफिकेट कोर्स इन बँकिंग अॅण्ड फायनान्सीअल सेक्टर
- सर्टिफिकेट कोर्स इन फंडामेंटल ऑफ सॉईल अॅण्ड वॉटर अॅनालिसिस
- सर्टिफिकेट कोर्स इन सायकोलॉजीकल फस्ट एड: नीड ऑफ टाईम
- सर्टिफिकेट कोर्स इन फोटोग्राफी
- सर्टिफिकेट कोर्स इन माइंडफुलनेस अॅण्ड रिलॅक्ससेशन थेरपी
- सर्टिफिकेट कोर्स इन योगा
- ग्रंथालय व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोर्स
- शासनमान्यता प्राप्त एम. एस. सी. आय. टी. कोर्स
- शासनमान्यता प्राप्त टॅली कोर्स
प्रवेश प्रक्रिया :
महाविद्यालयात बी. ए. भाग एक साठी प्रवेश घेण्यासाठी खालील प्रक्रियेचा अवलंब करावा.
दिनांक ०३ जून २०२४ पासून प्रवेश प्रक्रिया सुरु…
सर्वप्रथम महाविद्यालयाच्या स्टेशनरी विभागातून पदवीचे (UG) माहितीपत्रक घ्यावे. त्याचे सविस्तर वाचन करावे. नवीन बदललेल्या शैक्षणिक धोरणानुसार आपणास बी. ए. भाग एक मध्ये प्रवेश घ्यावयाचा असेल तर माहितीपत्रकात बी. ए. भाग एकसाठी विषयांच्या दिलेल्या गृपमधून प्रत्येकी एक विषय निवडावा. याशिवाय विषय निवडीसंबंधी माहितीपत्रकात दिलेल्या इतरही आवश्यक त्या सर्व सुचनांचे पालन करावे. त्यानंतर माहितीपत्रकात दिलेला प्रवेश अर्ज व्यवस्थित भरून प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत. त्यानंतर https://enrollonline.co.in/registration/apply/cscs या लिंकवरून रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन फॉर्म भरावा. आपला ऑफलाईन व ऑनलाईन प्रवेश अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रे समिती सदस्यांकडून तपासून घ्यावीत व परिपूर्ण फॉर्म महाविद्यालयाच्या कार्यालयात जमा करावा.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे :
१. प्रवेश अर्ज (महाविद्यालयातून घेतलेल्या माहितीपत्रकात मिळेल)
२. शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल) व एक झेरोक्स प्रत
३. १२ गुणपत्रक दोन झेरोक्स प्रती
४. १० प्रमाणपत्र एक झेरोक्स प्रत
५. जात प्रमाणपत्र एक झेरोक्स प्रत
६. गॅॅप असल्यास ओरीजनल गॅॅप प्रमाणपत्र व एक झेरोक्स प्रत
७. दोन आयकार्ड साईज फोटो
८. आधार कार्ड झेरोक्स एक प्रत
एकूणच शैक्षणिक क्षेत्रात आपली गौरवशाली परंपरा जतन करणाऱ्या या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. या महाविद्यालयात प्रवेश घेऊन आपणही भारतातील सर्वात मोठ्या शैक्षणिक चळवळीत सहभागी होऊ शकता. कला शाखेत प्रवेश घेऊन आपल्या व्यक्तिमत्वचा सर्वांगीण विकास साधत, मोठमोठ्या प्रशासकीय पदांना गवसणी घालण्याची, क्रीडा, साहित्य, संगीत, एन. एस. एस. व एन. सी. सी. च्या माध्यमातून सामाजिक सेवा व राष्ट्रसेवा आदी सर्व क्षेत्रात आपले उज्वल भविष्य घडविण्याची अनोखी संधी या महाविद्यालयाद्वारे आपणास उपलब्ध झालेली आहे.
महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया संबंधी अधिक माहितीसाठी संबंधित वर्गाच्या प्रवेश समितीमधील सदस्यांशी संपर्क साधावा. अकरावी व बारावी प्रवेश प्रक्रियेसाठी प्रा. गणेश पाटील मोबा. नं.९८५०१७१५४५ तर बी. ए. भाग एक प्रवेश प्रक्रियेसाठी प्रो. डॉ. धनाजी मासाळ मोबा. नं. ९८६०६८१८३८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी केले आहे.