नमस्कार, मराठी वाचक स्त्रोतेहो…
gloriousmarathi.com ही वेबसाईट मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी हातभार लावण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. ज्या माध्यमातून मराठी भाषेमध्ये अत्यंत उपयुक्त माहिती समाजापर्यंत पोहचविण्याचा आमचा एक मानस आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक महापुरुष, समाजसुधारक व क्रांतिकारक यांचे प्रेरणादायी विचार, त्यांचे जीवनकार्य व सध्याच्या कालखंडात त्यांच्या विचारांची प्रस्तुतता या दृष्टीने वस्तुनिष्ठ माहिती दिली जाईल. सोबतच सुखी व समाधानी जीवनाची तत्त्वे, समाजापासून अनभिज्ञ असलेली परंतु सत्यनिष्ठ व विवेकवादी ऐतिहासिक माहिती, बदलते शैक्षणिक धोरण व त्याचे समाजावरील होणारे परिणाम आदी विविध विषयांवर या वेबसाईटद्वारे प्रकाश टाकला जाईल. ज्या माध्यमातून आपली वस्तुनिष्ठ माहितीची मिळविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. आशा आहे की, आपण सर्वजण याचे निश्चितच स्वागत कराल !