आधुनिक महाराष्ट्राला पुरोगामी वैचारिकतेची, क्रांतिकारी विचारांची, परिवर्तनवादी चळवळीची गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे त्यातील योगदान खूप मोठे आहे. शिक्षणाची द्वारे विशिष्ट वर्गापुरती बंधिस्त असताना रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून आपल्या कारकिर्दीमध्येच संस्था नावारूपाला […]
Author: mahadevchinde1
II गुरु साक्षात परब्रह्म II
एक कृतज्ञतापूर्वक प्रणाम आपल्या आदरणीय गुरुवर्यांना भारतीय प्रथा आणि परंपरेनुसार प्रत्येक दिवसाला काही ना काही विशेष महत्त्व असते. त्याचप्रमाणे आज ०५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर ‘शिक्षक दिन’ म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे त्यानिमित्ताने….. ०५ सप्टेंबर हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा किंवा करू नये द्वंद्वात फारसे न जाता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा […]
शहिदांच्या रक्तानं भिजली इथली माती I त्याचा तिलक लावूया आज आपुल्या माथी II शौर्य आणि पराक्रमाची सांगे तिरंगा गाथा I माझ्या भारत भूचा सदैव उन्नत माथा II कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे घटक […]
माझं कॉलेज, माझा अभिमान-‘ऋणानुबंध’ छत्रपती शिवाजी कॉलेजचा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा (स्वायत्त) मधील माजी विद्यार्थी संघ आणि कमवा व शिका योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ जुलै २०२४ रोजी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. राजेंद्र […]
छत्रपती शिवाजी कॉलेज हे केवळ साताऱ्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक अग्रनामांकित महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. या कॉलेजची स्थापना स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला जून १९४७ मध्ये झाली. थोर समाजसुधारक शिक्षणभगीरथ, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे हे पहिले महाविद्यालय अशीही या कॉलेजची ओळख आहे. कॉलेजने आपल्या स्थापनेपासूनच विद्यापीठ कार्यक्षेत्रात आपल्या गुणात्मक, संस्थात्मक व […]
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा: वारसा शिवरायांचा विचार कर्मवीरांचा…… आधुनिक महाराष्ट्राच्या गौरवशाली जडणघडणीच्या परंपरेत अनेक संस्था व व्यक्ती यांनी आपापल्या परीने सर्वतोपरी योगदान दिलेले आहे.सुधारणावादी, पुरोगामी, महाराष्ट्राच्या या जडणघडणीच्या परंपरेत ‘रयत शिक्षण संस्था’ आणि रयत संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागतो.महाराष्ट्रातील अठरा पगड जातीतील, गोर गरिबांच्या मुलांनी शिकावे, त्यांचा […]
प्रिय असो अमुचा महाराष्ट्र महान………..
संपूर्ण देशभरात असलेली विविध राज्ये काही विशिष्ट गोष्टींसाठी परिचित असतीलही परंतु देशात महाराष्ट्र हे राज्य सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व इतर सर्वच बाबतीत एक अग्रगण्य राज्य म्हणून आजही आपली ओळख प्रस्थापित करून आहे. या राज्याच्या निर्मितीच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकल्यावर त्यातून स्वत:च्या अस्तित्वाची, अस्मितेची व नवनिर्मितीची स्फूर्ती मिळाल्याशिवाय राहत नाही असा तो दैदिप्यमान इतिहास आहे. […]