आधुनिक महाराष्ट्राला पुरोगामी वैचारिकतेची, क्रांतिकारी विचारांची, परिवर्तनवादी चळवळीची गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे त्यातील योगदान खूप मोठे आहे. शिक्षणाची द्वारे विशिष्ट वर्गापुरती बंधिस्त असताना रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून आपल्या कारकिर्दीमध्येच संस्था नावारूपाला […]